Chinchpoklis Chintamani mumbai Patpujan ceremony is celebrated in a traditional manner

चिंचपोकळी - गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना काळ पाहता उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता, यंदा कोरोना संक्रमण तीव्रता थोडी कमी असल्याने तसेच परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने मंडळाने गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे ठरविले.

  Chinchpoklis Chintamani mumbai Patpujan ceremony is celebrated in a traditional manner
  यंदाचे हे १०३ वर्ष असून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचा शुभारंभ नुकताच “पाटपूजन सोहळ्याने झाला. मंडळाचे उपमानदसचिव चारुदत्त लाड यांच्या शुभहस्ते पाटपूजन सोहळा मंगलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

  Chinchpoklis Chintamani mumbai Patpujan ceremony is celebrated in a traditional manner
  अतिशय नेत्रदीपक सजावट मंडळाचे सभासद लक्ष्मीकांत (बंटी) आचरेकर, मंगेश घाणेकर, गणेश गावडे, आणि गणेश कुर्ले यांच्या कला कुंचल्यातून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. एच ए म्युझिशियन, केदारनाथ ढोल ताशा पथक, मावळे आम्ही ढोल – ताशांचे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात सर्व चिंतामणी भक्तांचे स्वागत करून चिंतामणीच्या चरणी आपली सेवा रूजू केली.

  Chinchpoklis Chintamani mumbai Patpujan ceremony is celebrated in a traditional manner
  यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश सिताराम नाईक, कार्याध्यक्ष-भालचंद्र परब, मानदसचिव श्री वासुदेव गजानन सावंत आणि कोषाध्यक्ष श्री अतुल केरकर यांच्यासह पदाधिकाऱी तसेच विभागातील अनेक मान्यवरांनी पाटपूजन सोहळ्यास भेट देऊन दर्शन घेतले.