आजकाल हॉरर (Horror) आणि  सस्पेन्स असलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता अभिनेत्री नयनतारा ‘कनेक्ट’ (Connect) नावाचा हॉरर चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर (Connect Teaser) प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ‘कनेक्ट’ या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा ९५ मिनिटांचा मध्यांतर (Movie Without Interval ) नसलेला सिनेमा असेल. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट सलग बघावा लागणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत बहुदा  असा प्रयोग प्रथमच होत आहे, त्यामुळे लोक यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.  टीझरमध्ये एका लहान मुलीचा आवाज ऐकू येत असतो. ती रडत असते आणि “आई, मला सोड. मला भीती वाटते”.असं म्हणत असते. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेरदेखील यात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.अश्विन सरवणन दिग्दर्शित, ‘कनेक्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने नयनतारा दुसऱ्यांदा आश्विनबरोबर काम करणार आहे.नयनताराचा पती विघ्नेश शिवन याने या आगामी ‘कनेक्ट’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.