disha wakani

  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही अनेकांची आवडती मालिका आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची (Dayaben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani Blessed With A Baby Boy) दुसऱ्यांदा आई झाली आहे.

  Disha-Vakani

  दिशाने २०१७ मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, त्यानंतर आता तिने एका मुलाला जन्म दिला आहे. दिशा २०१७ पासून ब्रेकवर आहे. दिशाचा भाऊ मयूर वाकानी याने घरात नवीन पाहुणा आल्याची माहिती दिली आहे.

  disha with daughter

  नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

  dayaben

  तारक मेहता शोमध्ये मयूर वाकानी दयाबेनचा भाऊ सुंदरलाल याची भूमिका साकारतो. मयूर आता दुसऱ्यांदा मामा बनल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मयूर वाकानी याने सांगितलं की, तो दुसऱ्यांदा मामा झाल्याने खूप आनंदात आहे.

  disha pic

  अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोचे निर्माते असित मोदी म्हणाले होते की, दयाबेनचे पात्र यावर्षी शोमध्ये परत येईल. मात्र या भूमिकेत दिशा वाकानीने दिसेल की, नाही याबाबत संशय होता. पण, आता दिशाने एका मुलाला जन्म दिल्यामुळे, ती या शोमध्ये सध्यातरी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत शोमध्ये तिची जागा दुसरा कुणी घेऊ शकतं.

  disha godbharai

  दिशा वाकानीने पुन्हा दयाबेनचं पात्र साकारावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.