‘दे धक्का’ (De Dhakka) चित्रपट आजही अनेकांना आठवत असेल. मकरंद अनासपुरे (Makarand Anaspune), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) , शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी हा चित्रपट गाजवला. आता ‘दे धक्का’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा ५ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज (De Dhakka 2 Teaser) झाला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील पात्र मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसना पाहायला मिळत आहे. सायली या पात्राची चित्रपटात एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री गौरी इंगवले ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये एक कार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जाधव कुटुंबियांची लंडन वारी या भागात पाहायला मिळणार आहे.