मागील सरकारच्या काळात सेवांतर्गत वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी PG च्या MD/MS जागांसाठी 25% कोटा देण्याचा निर्णय घेतला होता.पण अनेक महिने उलटूनही वैद्यकीय शिक्षण मंत्रीच राज्याला नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्यामुळे हा निर्णय अद्यापही कागदावरच आहे.त्यामुळे निट PG परिक्षा पात्र झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.