कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी चिंचपाडा, माणेरे येथील एकूण २२ अनधिकृत जीन्स गोडाऊन्सवर धडक कारवाईचा बडगा उगारत तोडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.