ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला ‘दिल दोस्ती दिवानगी’(Dil Dosti Deewangi)  हा मराठी चित्रपट (Marathi Movie) 6 ऑक्टॉबेरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा यात मांडण्यात आली आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर अनेक अनपेक्षित गोष्टी घडतायत. या सगळ्या अनपेक्षित गोष्टींचा शेवट कसा होणार हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. विद्याधर जोशी, सुरेखा कुडची, स्मिता गोंदकर, वीणा जगताप, कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.