बाळासाहेबांची शिवसेना(Shivsena) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात डोंबिवलीची (Dombivali) मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची यावरून अंदाजे दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात वादावादी झाली होती. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळला. ही शाखा आमचीच आहे असा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून करण्यात आला . मात्र अधिकृतपणे जागा आमच्या नावावर झाल्याचा दावा शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.