बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) गेल्या काही दिवसांपासून ‘अपूर्वा’(Apurva Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी ‘अपूर्वा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. आता या चित्रपटातील ‘दिवाली’(Diwali) हे गाणं रिलीज झालं आहे. विशाल मिश्राने हे गाणं गायलं आहे. ‘अपूर्वा’ या चित्रपटात तारा आणि धैर्य करवा यांच्यातलं प्रेम दिसून येतंय. ‘अपूर्वा’ हा चित्रपट 15 नोव्हेंबरला डिज्नी + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.