अक्षय कुमार (Akshay Kumar), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) या चित्रपटातील ‘डन कर दो’ (Done Kar Do Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रक्षाबंधन हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे ज्याचं गाणं युकेमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. त्यामुळे हा एक वेगळा रेकॉर्ड आहे. आनंद एल राय यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये नीरज सूद, सीमा पाहवा, सादिया खतीब, अभिलाष थपलियाल, दीपिका खन्ना, स्मृति श्रीकांत आणि सहजमीन कौर हे कलाकारही झळकणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ ला रिलीज होणार आहे.