औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता जर उलट सुलट बोलाल तर याद राखा असा थेट इशारा नारायण राणे यांना दिला आहे. तसेच तुमची शुगर आधीच खूप वाढली आहे अजून वाढू देऊ नका असा सल्लाही त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.