एकनाथ शिंदेनी गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवीचं घेतलं दर्शन!

राजकारणात नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यांची देवावर फार श्रद्धा असल्याचं बोललं जातं. दरम्यान आज सगळ्याच आमदारांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.

  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होत असताना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज आसामच्या गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.

   

  महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थीती पाहता एकनाथ शिंदे यांच्या सोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

   

  आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.

   

  आज कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बंडखोर आमदार दुपारी 3.30 च्या सुमारास गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.
  यावेळी एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदार उपस्थित होतेे.