जान्हवी कपूरचे हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ

    बॉलिवूड (Bollywood) मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

    तिच्या बोल्ड लुक मुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चा रंगत असून तिच्या अशाच एका बोल्ड आणि हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

    जान्हवी कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी असून तिने मराठीच्या सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटातून पदार्पण केलं होत.

    जान्हवीने पोस्ट केलेल्या नव्या फोटो शूटमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसत आहे. फोटोज मधील तिच्या अदा चाहत्यांना भुरळ घालत असून तिच्या या फोटोजवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे.

    जान्हवी कपूरचे इंस्टग्रामवर १८. ५ मिलियन फॉलोवर आहेत.