शेतात पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करत थांबतात. मात्र मचाण तितके सुरक्षित नसते. शेतकऱ्यांना शेतात थांबण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील (Wardha) शेतकऱ्याच्या मुलाने संपूर्ण सुविधायुक्त मचाण (जंगलात शिकारीसाठी केलेली बसण्याची जागा) तयार केले आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार करण्यात आला आहे. वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील आसारखेडा येथील युवक शेतात रात्रीच्या वेळीचे लाकडी मचाण तयार करतात. तसेच मचाण योगेश लिचडे (Yogesh Lichade) या युवकाने तयार केली. हे हायटेक मचाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.