उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या ‘गैरी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Gairee Trailer Launch) नुकताच रिलीज झाला आहे. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला ‘गैरी’(Gairee) चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या ‘गैरी’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग जाधव (Pandurang Jadhav) यांनी केलं आहे. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयूरेश पेम (Mayuresh Pem), नम्रता गायकवाड (Namrata Gaikwad), प्रणव रावराणे (Pranav Raorane), आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.