gaurav ghatnekar photos

‘अबोली’(aboli) मालिकेत अभिनेता गौरव घाटणेकर (gaurav ghatnekar photos) हा वकील अजिंक्य राजाध्यक्षची (ajinkya rajadhyaksha) भूमिका साकारणार आहे. त्याच्या या मालिकेतील लूकचे काही फोटो समोर आले आहेत. पाहा त्याचीच एक झलक.

  स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘अबोली’ (Aboli) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. अभिनेता गौरव घाटणेकर अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

  gaurav ghatnekar in aboli

  अबोली मालिकेतील ही वकिलाची भूमिका साकारण्यासाठी गौरव अतिशय उत्सुक आहे.

  gaurav ghatnekar new look

  या भूमिकेविषयी सांगताना गौरव म्हणाला, ‘मी याआधी बऱ्याचदा वकिलाची भूमिका साकारली आहे. मला वकिलाची भूमिका साकारायला अतिशय आवडतं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वकील साकारताना अतिशय ताकदीचे संवाद सादर करता येतात. एक अभिनेता म्हणून मला हे अतिशय आव्हानात्मक वाटतं.

  gaurav ghatnekar

  अजिंक्य राजाध्यक्ष हा तत्वनिष्ठ वकील आहे. अबोली निर्दोष आहे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा तिला न्याय मिळून देण्याच्या एकमेव हेतूने तो ही केस हाती घेतो.

  gaurav ghatnekar in advocates role

  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अबोलीच्या विरोधात अजिंक्यची सावत्र बहिण विजया राजाध्यक्ष केस लढत आहे. त्यामुळे अबोलीला न्याय मिळवून देण्यासाठी गौरव जीवापाड मेहनत घेणार आहे अशी भावना गौरव घाटणेकरने व्यक्त केली. अबोली मालिकेतील न्यायाची ही सर्वात मोठी लढाई स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.