जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळते. आता या कुटुंबाचे आणि 'गोदावरी'चे नक्की काय नाते आहे, हे सध्या गुलदस्त्यात असले तरी लवकरच याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.