एका वेगळ्या स्वप्नाची गोष्ट आपल्याला शंतनू रोडे (Shantanu Rode) दिग्दर्शित, लिखित ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. यावर्षीच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान मिळवलेल्या या चित्रपटात सायली संजीव (Sayali Sanjeev), सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर (Goshta Eka paithanichi Trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा असामान्य प्रवास या चित्रपटामध्ये आहे. मंत्रा व्हिजन प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशिओ फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाईड प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची’ महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.