
गुढीपाडव्याच्या दिवशी सगळीकडे एक वेगळंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. मराठी मालिकांमध्येही गुढीपाडवा साजरा होणार आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’, ‘ठरलं तर म’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. पाहा या सेलिब्रेशनचे खास फोटो.
गुढीपाडव्याला ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना गुढीची पूजा करणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करणार आहेत.
पाडवा साजरा करण्यासाठी अर्जुन आणि सायलीसह संपूर्ण कुटुंबाचा उत्साह दिसून आला.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतही गुढीपाडवा साजरा करण्यासाठी सगळे सज्ज आहेत.
पारंपरिक पेहरावात कानेटकर कुटुंब पाडवा साजरा करताना दिसणार आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतही संपूर्ण कुटुंब पाडव्यासाठी एकत्र आलं आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतही मोरे कुटुंब एकत्र सण साजरा करण्याच्या तयारीत आहे.