Happy birthday nawazuddin siddiqui

  नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) एक असा अभिनेता आहे ज्यांच्या घरातील कोणीही चित्रपटसृष्टीमध्ये नव्हतं. त्यांना चित्रपटसृष्टीत कुणीही गॉडफादर नव्हता. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही भूमिकेत एकदम फिट बसणारे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui Photos) आज आपला ४८ वा वाढदिवस (Happy Birthday Nawazudin Siddiqui) साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्याविषयीची माहिती जाणून घेऊयात.

  nawazuddi sidduqui in white suit

  नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म १९ मे १९७४ मध्ये मुज्जफरनगरमधील बुढाना या गावात झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता की त्यांना कधी वॉचमन तर कधी कुक बनून घर चालवावं लागत होतं. नवाजुद्दीन यांनी १९९९ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांना ‘सरफरोश’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर नवाजुद्दीन यांनी खूप मेहनत घेऊन स्वत:ची एक प्रतिमा निर्माण केली.

  nawazuddin siddiqui pic
  आज हा अभिनेता एका चित्रपटासाठी तब्बल ६ कोटी इतकं मानधन घेतो. तसेच विविध जाहीरातींमधूनही त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात.

  nawazuddin siddiqui photo

  नवाजुद्दीन यांनी आपल्या गावी बांधलेल्या नव्या घराची किंमत १७ कोटी आहे. शिवाय त्यांच्याजवळ मर्सिडीज बेन्ज, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा अनेक लक्झरी कार आहेत. आज नवाजुद्दीन यांच्याजवळच्या संपत्तीचा आकडा ९० कोटींपेक्षा जास्त आहे.

  nawazuddin siddqui