पृथ्वीराज (Prithviraj) चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. ट्रेलरनंतर आता या चित्रपटामधील पहिलं गाणं 'हरी हर' (Hari Har Song) प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार हा मैदानामध्ये लढताना दिसत आहे. तसेच राजकुमारी संयोगिता आणि पृथ्वीराज यांच्या विवाह सोहळा ही या गाण्यात दिसत आहे. 'हरी हर' या गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते पाहिलं. गायक आदर्श शिंदेनं हे गायलं आहे. तसेच वरुण ग्रोव्हर हे या गाण्याचे गीतकार आहेत. नेटकऱ्यांकडून या गाण्याला पसंती मिळाली आहे. पृथ्वीराज चित्रपटामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लरसोबत (Manushi Chhillar) संजय दत्त (Sanjay Dutt), सोनू सूद (Sonu Sood) आणि मानव विज हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.