सुशांत सिंग राजपूतच्या गर्लफ्रेंडचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

  हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Reha Chakraborty) ही बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  निधनानंतर अधिकच चर्चेत आली होती.

  सुशांतच्या निधनानंतर तिचे नाव हे सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी ते ड्रग्स पर्यंत अनेक प्रकरणात गोवण्यात आले होते.

   

  सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला २ वर्ष झाली आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येप्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे पहायला मिळते.

  मात्र सुशांतच्या निधनानंतर अनेक आरोप प्रत्यारोप तसेच ट्रोलिंग सहन केलेली त्याची गर्लफ्रेंड रिया ही आता हळूहळू स्थिरस्थावर होत असल्याचे पहायला मिळत आहे.

  रिया ने काही दिवसांपूर्वी तिच्या साडी मधल्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रिया चक्रवर्ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिच्या पुढील येणाऱ्या काही प्रोजेक्ट्सची माहिती ती सोशल मीडियावरून चाहत्यांना देत असते.