सई ताम्हाणकरच्या दिल खेचक अदा पाहिल्यात का?

  मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) ही नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.

  सोशल मीडियावर ती आपल्या फॅन्स सोबत अनेकदा संवाद साधत असून सोशल मीडियावर सईची लोकप्रियता अफाट आहे.

  सईने नुकतेच एक नवे फोटोशूट केले असून तिचा लुक चाहत्यांना घायाळ करत आहे. सई या फोटोंमध्ये न्यूड पिंक रंगाच्या मिनी ड्रेस मध्ये दिसून येत आहे.

  सईने दिलेल्या  एका पेक्षा एक सुंदर पोजवर चाहते फिदा झाल्याचे पहावयास मिळत आहे. इन्स्ट्राग्रामवर तिचे तब्बल १. ४ मिलिअन फॉलोर्स असून तिच्या नव्या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

  मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही हळहळू हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला जम बसवू लागली आहे. तिला नुकतच सहाय्य्क अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर हा मनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  यापूर्वी सईला तिच्या अभिनयासाठी आयफा पुरस्कार देखील मिळाला होता.