बाल कलाकार म्हणून मालिकेतून केली होती सुरुवात, पण दिग्दर्शनाच्या आवडीनं बनला यशस्वी दिग्दर्शक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) आज 50 वा वाढदिवस आहे.' त्याच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊया त्याच्या आयुष्याबद्दल.

  करण जोहरचा आज 50 वा वाढदिवस आहे. करणचा जन्म 25 मे 1972 रोजी झाला. करण हा चित्रपट निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांचा मुलगा आहे.

   

  सहाय्यक दिगर्दर्शक म्हणून ‘दिलवाले दुल्हिनयां ले जाएंगे’ या चित्रपटामधून बॉलिवूडमधील करिअरला केली सुरूवात

   

  करण जोहरला चित्रपटांमधील योगदानाबद्दल भारत सरकारने २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचवेळी, मनमोहन सिंग यांच्यानंतर करण हा दुसरा भारतीय आहे. ज्यांना लंडन ऑलिम्पिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

   

  करण हा 1400 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तो तीन कोटी रुपये मानधन घेतो.

   

  सेरोगेसीच्या माध्यमातून करण जोहर जुळी मुलांचा पिता बनला आहे. त्याच्या मुला मुलीचे फोटो व्हिडीओ तो नेहमी सोशल मिडियावर शेयर करत असतो.

   

  करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.