आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला राजकुमार राव (Rajkumar Rao) लवकरच क्राइम थ्रिलर चित्रपट ‘हिट द फर्स्ट केस’ (Hit The First Case) मध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या दमदार टीझरनंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर (Hit The First Case Trailer Release) रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) स्क्रीन शेअर करणार आहे. या ट्रेलरमध्ये राजकुमार राव पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूतकाळातील आठ‌वणींमध्ये तो रमला आहे. सान्या मल्होत्रा राजकुमार रावची गर्लफ्रेंड म्हणून भूमिका निभावणार आहे. या चित्रपटामध्ये शानू कुमार आणि रोहन सिंहसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे.