मधमाशी दूर जरी दिसली, तरी सामान्य माणूस ती दंश करेल या भीतीने दूर पळतो. मात्र अख्खं मधमाश्यांच पोळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं धाडस सोलापुरातील वन्यजीवप्रेमींनी केले आहे. सोलापुरातील फरहान इनामदार यांच्या घरात मधमाश्यांचा मोहोळ लागलं होत. इनामदार कुटुंबियांनी याची माहीती वन्यजीवप्रेमींना दिली. वन्यजीव प्रेमींनी ‘हनी बी किट’ परिधान केला आणि एका बॉक्समध्ये लाईटचा प्रकाश दाखवून पूर्ण मधमाश्यांचा पोळं बॉक्समध्ये घेऊन ते सिद्धेश्वर वनविहिरीत सुरक्षितरित्या सोडलं.