Huge loss of chillies in Kalmana market due to presence of torrential rains in Nagpur, lack of cold storage facility

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने व वादळी वाऱ्याने कळमना बाजारपेठेची झालेली दुरवस्था पाहायला मिळली. तसेच, यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे कळमना बाजारपेठेत नसलेली  कोल्ड स्टोरेजची सुविधा. यामुळे कित्येक किलो मिरचीचे आणि गव्हाचे नुकसान झाले आहे. तसेच, यावेळी आपल्याला या बाजापेठेतील रस्त्यांची दुरावस्थाही पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत प्रशासनाचे लक्ष कुठे आहे, हा प्रश्न विचारला जात आहे.   

    मिरचीने भरलेल्या पोत्यातील संपूर्ण मिरची खराब झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान
    कोल्ड स्टोरेजची सुविधा नसल्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे ओढवली ही परिस्थिती
    विक्रीसाठी ठेवलेल्या गव्हावर पावसाच्या सरी बरसल्यामुळे गव्हाचे प्रचंड नुकसान
    कळमना बाजारपेठेतील रस्त्याची झालेली अशी दुरावस्था पाहायला मिळत आहे.
    पावसामुळे काळ्या पडलेल्या मिरचीची विल्हेवाट लावतांना महिला कामगार