‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत  महाविद्यालयाचे’ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्धाटन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. आज लता दीदींच्या जयंती निमित्त 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्धाटन झाले आहे. या महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना आजपासून सुरुवात झाली आहे. पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयाची वास्तू तयार झाल्यानंतर कलिनामध्ये महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे". लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.