World Rhino Day निमित्त गेंड्याबद्दल जाणून घ्या काही मनोरंजक तथ्ये, पाहा VIDEO…

गेंड्यांच्या पाचही प्रजातींची जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी व केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी जागतिक गेंडा दिवस साजरा केला जातो. २०११ पासून, जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो - या वर्षी याचा १०वा वर्धापन दिन आहे.

    World Rhino Day 2021 निमित्त गेंड्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये व्हिडिओच्या माध्यमातून पहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये गेंड्याच्या विविध प्रजाती आणि त्याची अवाढव्य शक्ती दाखवण्यात आली आहे. तसेच गेंड्याचा आकार, रंग आणि धावण्याचा वेग काय आहे? अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पहायला मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गेंड्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये…