लग्नाच्या दोन दिवसानंतर सुरभी चंदनाने फोटो केले शेअर, पेस्टल शेडच्या लेंहग्यात खुप सुंदर दिसतेय नववधू

  इश्कबाज फेम चुलबुली अभिनेत्री सुरभी चंदना विवाह बंधनात अडकली आहे, प्रियकर करण शर्मासोबत जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. (PC- surabhi instagram account )
  त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
  सुरभीनं जयपूरमध्ये प्रियकर करण शर्माबरोबर लग्न केलं. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याला हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक टिव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती.
  लग्नात सुरभीने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता व डोक्यावर पिच कलरची ओढणी घेतली होती; तर करणने ग्रे रंगाची शेरवानी आणि गोल्डन रंगाची पगडी घातली होती
  लग्नात दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
  तिच्या फोटोवर फॅन्ससहीत सेलेब्रिटीही कमेंट्स करताना दिसत आहेत.
  सुरभीनं लोकप्रिय मालिका ‘कुबूल है’ मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. आता ती टिव्हीवरली एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.