मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार की जातीवाद करतात. महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्या दैवताच्या इतिहासाशी खेळण्याची मस्ती कोणीही करू नये असा इशारा आव्हाडांनी दिला आहे. आमच्याबद्दल कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणा आम्हाला काही फरक पडत नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.