धाकड फ्लॉप झाल्यानंतर कंगना पोहोचली मनालीत, कुटुंबासोबत घालवतेय ‘क्वालिटी टाईम’

धाकड चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगना रणौत कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तिच्या गावी गेली आहे. ती सध्या मनालीमध्ये आपल्या कुटुंबासोबत पिकनिक एन्जॉय करत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत.

   

  पिकनिकचे फोटो शेअर करताना कगंना राणौत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत विश्रांतीचा दिवस खूप आवश्यक आहे… आणि हवामानही खूप छान होते. हा खूप सुंदर दिवस आहे.”

   

  फोटोंमध्ये कंगना पोल्का डॉट रेड ड्रेस आणि टोपी घातलेल्या लूकमध्ये दिसत आहे.

   

  कंगना रणौत तिच्या पुतण्यासोबत खेळताना करताना दिसत आहे.

   

  कंगनाने तिच्या आईला मिठी मारतानाच फोटो पोस्ट केला आहे. या सगळ्या फोटोंना फॅन्सची पंसती मिळतेय.