यशराज फिल्म्सने(Yashraj Films) ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’(The Great Indian Family) या त्यांच्या आगामी चित्रपटातलं पहिलं गाणं आज रिलीज केलं आहे. ‘कन्हैया ट्विटर पे आजा...’ हे गाणं विकीचं चित्रपटातील एन्ट्री सॉन्ग आहे. यात अभिनेता विकी कौशल स्टेजवर गाण गाताना आणि नाचताना दिसतोय. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’(TGIF) चित्रपटात विकी कौशल सिंगिंग सेन्सेशन भजन कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केलं आहे. यशराज फिल्म्स, विजय कृष्णा आचार्य आणि विकी कौशल या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आले आहेत. ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ हे गाणं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी ते लिहिलं आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे.