1/6
मुंबई : किआ मोटर्सने आपल्या येणाऱ्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही Sonet ची अधिकृत फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोत Kia Sonet च्या एक्सटिरियर आणि इंटिरियरची झलक पाहायला मिळते. ७ ऑगस्टला Sonet SUV चे अनावरण होणार आहे. ही नवी एसयुव्ही आकर्षक डिझाइन आणि अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट (या सेगमेंटच्या कार मध्ये प्रथमच) फीचर्ससह येणार आहे.

2/6
सॉनेट एसयुव्हीच्या फ्रंटला किआची सिग्नेचर 'टाइगर नोज' ग्रील, एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प आणि स्पोर्टी फ्रंट बंपर मिळणार आहेत. नव्या फोटोत या गाडीचे ब्लॅक रूफ, सिल्वर रूफ रेल्स, अलॉय व्हील्ससह भारी-भक्कम व्हील आर्च, एलईडी टेललॅम्प, टेललॅम्प्सला कनेक्ट करणारी एलईडी स्टॉप लाइट स्ट्रिप आणि मोठे सिल्वर फॉक्स स्किड प्लेट्सही दिसत आहेत.

3/6
किआ सॉनेट मध्ये UVO कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सह 10.25-इंचाची एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल, जी या सेगमेंटच्या या कारमध्ये प्रथमच देण्यात आली आहे. डॅशबोर्डसाठी हाय-क्वालिटी मटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे. यात 3-स्पोक स्टियरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मोठ्या सिल्वर बेजल्ससह व्हर्टिकल एअर-कॉन वेंट्स आणि गियर लीव्हरच्या चारही बाजूला सिल्व्हर बेजल दिले आहेत.

4/6
फीचर्स 
किआच्या या छोट्या एसयुव्हीत Bose साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, एयर-प्योरिफायर, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, रियर एसी वेंट्स, पुश बटन स्टार्ट-स्टॉप आणि 360 डिग्री कॅमरा सारखे फीचर्स असणार आहेत.याशिवाय सॉनेट एसयुव्ही मध्ये 6-एयरबॅग्ससह अनेक आकर्षक सेफ्टी फीचर्सही असतील.
फीचर्स किआच्या या छोट्या एसयुव्हीत Bose साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, एयर-प्योरिफायर, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, रियर एसी वेंट्स, पुश बटन स्टार्ट-स्टॉप आणि 360 डिग्री कॅमरा सारखे फीचर्स असणार आहेत.याशिवाय सॉनेट एसयुव्ही मध्ये 6-एयरबॅग्ससह अनेक आकर्षक सेफ्टी फीचर्सही असतील.
5/6
इंजिन
किआ मोटर्सने सॉनेट एसयुव्हीच्या इंजिनच्या ऑप्शनची माहिती शेअर केलेली नाही. याचे इंजिन ह्युंदाईच्या वेन्यू एसयुव्ही सारखे असणार आहे. यात 1.2-लीटर नॅचरली-ऐस्परेटेड पेट्रोल, 1.5-लीटर डीजल आणि 1.0-लीटर GDi टर्बो-पेट्रोल इंजनचा समावेश आहे. एसयुव्हीत 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक आणि क्लच-लेस IMT गिअरबॉक्सचे ऑप्शन असतील.
इंजिन किआ मोटर्सने सॉनेट एसयुव्हीच्या इंजिनच्या ऑप्शनची माहिती शेअर केलेली नाही. याचे इंजिन ह्युंदाईच्या वेन्यू एसयुव्ही सारखे असणार आहे. यात 1.2-लीटर नॅचरली-ऐस्परेटेड पेट्रोल, 1.5-लीटर डीजल आणि 1.0-लीटर GDi टर्बो-पेट्रोल इंजनचा समावेश आहे. एसयुव्हीत 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक आणि क्लच-लेस IMT गिअरबॉक्सचे ऑप्शन असतील.
6/6
लॉन्चिंग आणि किंमत
किआ मोटर्सच्या या नव्या एसयुव्हीचे 7 ऑगस्टला अनावरण होणार असून हिचे लाँचिंग सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सॉनेटची किंमत 7-12 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये हिची स्पर्धा मारुती ब्रेजा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू आणि महिंद्रा एक्सयुव्ही 300 सारख्या गाड्यांसोबत असणार आहे.
लॉन्चिंग आणि किंमत किआ मोटर्सच्या या नव्या एसयुव्हीचे 7 ऑगस्टला अनावरण होणार असून हिचे लाँचिंग सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सॉनेटची किंमत 7-12 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये हिची स्पर्धा मारुती ब्रेजा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू आणि महिंद्रा एक्सयुव्ही 300 सारख्या गाड्यांसोबत असणार आहे.