किसान सभा केंद्र सरकारचा राज्यभर तीव्र निषेध करणार : डॉ. अजित नवले

सोयाबीनचे दर 11111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने घेरले गेले आहेत. केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.