‘हिट द फर्स्ट केस’ (HIT The First Case) चित्रपटातील ‘कितनी हसीन होगी..’ (Kitni Haseen Hogi Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हे गाणं म्हणजे वर्षातलं सगळ्यात चांगलं लव्ह अँथम असल्याचं म्हटलं जात आहे. या गाण्यामध्ये राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) यांची सुंदर केमिस्ट्री बघायला मिळत आहे. अरिजीत सिंग याने हे गाणं गायलं असून साईद काद्री यांनी हे गाणं लिहिलं आहे. मिथून यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. हे गाणं लोकांचं मन जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.