
गुजरातमधील क्षमा बिंदू (Kshama Bindu Got Married) या मुलीने स्वत:सोबत (आत्मविवाह) लग्न केले आहे. क्षमा हिने बुधवारी तिच्या वडोदरा येथील घरी मोठ्या धुमधडाक्यात (Kshama Bindu Wedding Photos) विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्षमाने आपण ११ जूनला स्वत:शीच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.मात्र तिच्या या निर्णयानंतर तिच्यावर टीका झाली होती. त्यामुळे तिने जाहीर केलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच आपला विवाह सोहळा उरकला.
२४ वर्षांच्या क्षमाने लग्नासाठी हातावर छान मेहंदी काढली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
ती या मेहंदीच्या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत होती.
मेहंदीसोबतच क्षमाच्या हळदीचाही खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिच्या मैत्रिनींनी खूप धमाल केली.
हळदीच्या कार्यक्रमात क्षमाचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
वडोदराच्या गोत्री येथील घरात क्षमाने रितीरिवाजानुसार लग्न केले. मात्र या लग्नामध्ये ना नवरा होता ना भडजी. डिजिटल पद्धतीने ४० मिनिटे लग्नाचा विधी चालला.
स्वत:शीच लग्न करण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र मला नवरी बनायचं होतं. त्यामुळं मी स्वत:शीच लग्न करायचा निर्णय घेतला, अशी माहिती क्षमाने दिली.