राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामध्येही संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat Landslide) दरड कोसळली आहे. चिपळूण - कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने घाटातील वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट आहे.