प्राइम व्हिडिओतर्फे (Prime Video) नुकतेच त्यांच्या ‘मजा मा’ (Maja Ma) या बहुप्रतिक्षित, पहिल्या भारतीय ॲमेझॉन ओरिजिनल मुव्हीच्या (Amazon Original Movie) ट्रेलरचे (Maja Ma Trailer Launch) अनावरण करण्यात आले. या फिल्ममध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासह दिग्गज कलावंत व फिल्म इंडस्ट्रीतील नवोदित कलाकारांची तगडी फौज या या फिल्ममध्ये आहे. यात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चड्ढा, मल्हार ठाकर व निनाद कामत यांचा समावेश आहे. लिओ मीडिया कलेक्टिव व अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती, आनंद तिवारी यांचे दिग्दर्शन व सुमित बाठेजा यांचे लेखन असलेल्या ‘मजा मा’चा प्रीमियर भारत व २४० हून अधिक देश-प्रदेशांमध्ये ६ ऑक्टोबर रोजी केवळ प्राइम व्हिडिओवरून होणार आहे.  नुकत्याच लाँच झालेल्या ट्रेलरमधून पल्लवीच्या (माधुरी दीक्षितने रंगवलेली व्यक्तिरेखा) आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. पल्लवी ही तिच्या मध्यमवर्गीय घराचा व ती राहत असलेल्या सोसायटीचा कणा आहे. फिल्मची कथा तिच्याभोवतीच फिरणारी आहे.