माधुरी दीक्षितच्या ट्रेडिशनल लुकने वेधलं सगळ्यांचं लक्ष

वयाच्या १७ व्या वर्षी तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करत माधुरीने आपल्या अभिनयाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने तिच्या मनमोहक रूपाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. माधुरी दीक्षित ‘धकधक गर्ल’ म्हणून नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. वयाच्या १७ व्या वर्षी तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करत माधुरीने आपल्या अभिनयाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे मोठ्या संख्येने फॅन फॉलोवर आहेत. माधुरीने अबोध या चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तेजाब चित्रपटाने तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. चला तर पाहुयात माधुरी दीक्षितचा ट्रेडिशनल लुक..

  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही तिच्या महाराष्ट्रीयन लुकमध्ये नेहमीच छान दिसते.

   

  माधुरी दीक्षित प्रत्येक पोषाखामध्ये छान आणि सुंदर दिसते. ती अनेकदा पारंपरिक साड्यांमध्ये दिसून आली आहे. काही दिवसांआधी पैठणी साडी घातलेला फोटो माधुरीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

   

  माधुरीचा अप्रतिम फॅशन सेन्स सर्वांनाच आवडतो. साडीमध्ये अभिनेत्री कायम आपल्या चाहत्यांना फॅशन टिप्स देत असतात.

   

  माधुरीने आतपर्यंत झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये साडी नेसली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असल्याने ती रोज नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माधुरीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.