बंजारा समाजाच्या (Banjara Community) मतांवर डोळा ठेवून शिवबंधन बांधून संजय राठोड (Sanjay Rathod) यांना धक्का देत पोहरादेवी (Pohradevi) येथील तीन महंत शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यासंदर्भात महंत जितेंद्र महाराज (Mahant Jitendra Maharaj) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही शिवबंधन बांधणार नाही. ज्यांनी कुणी ही अफवा पसरवली त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले. दरम्यान बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथून आम्ही राजकीय भूमिका घेत नाही. त्यामुळं आमचा शिवसेनेत जाण्याचा किंवा बंजारा समाज शिवबंधन बांधण्याची बातमी ही चुकीची असल्याच महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.