कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते.
कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला, हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या.

    आज पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ. कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापुजा केली.
    महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

     

    महापुजेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.