केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या चित्रपटाचा टीझर शाहीर साबळेंच्या स्मृतीदिनानिमित्त आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रिलीज करण्यात आला. शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमामध्ये अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) मुख्य भूमिकेत आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) यांची मुलगी सनादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या सिनेमात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होईल.