संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनित ‘वध’ (Vadh) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आज ‘वध’च्या निर्मात्यांनी ‘मेरी सजा’ (Meri Sazaa) हे गाणं रिलीज केलं आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मोफ्युजनचे संगीत आणि नवीन कुमारद्वारा लिखित या गाण्याचे कंपोझिशन लवी सरकार यांनी केले असून हे गाणे हार्दिक भारद्वाज यांनी गायले आहे. या गाण्यात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या पात्रांची कहाणी, तसेच त्यांच्या मुलाने आर्थिक मदत नाकारल्यावर त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.