नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अद्वेत याचा हट्ट होता की राज ठाकरे यांना भेटल्या शिवाय आज जेवणार नाही. या हट्टापायी त्याची आजी आणि तो राज ठाकरे येणार असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. राज ठाकरे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ही बाब त्यांना सांगितली. पण अद्वैत जेवल्याशिवाय आपण त्याला भेटणार नाही असा निरोप राज यांनी अद्वैतला पाठविला. तो जेवल्यानंतरच राज यांनी त्याची भेट घेतली आणि त्याला ऑटोग्राफही दिला.