‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणी मुखर्जीच्या (Rani Mukherjee) अभिनयाचं कौतुक केलं आहे. ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway Trailer) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राणी ही देविका चॅटर्जी या भूमिकेत दिसत आहे. देविका तिची दोन मुलं आणि पतीसोबत नॉर्वेमध्ये राहात असते. ट्रेलरमध्ये दिसते की देविकाच्या दोन मुलांना काही लोक घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी देविका कोर्टात लढा देते. देविकाला तिची मुलं परत मिळतात का ? देविकाला नॉर्वेमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळणार आहेत. हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे.