मोहित रैनाच्या (Mohit Raina) 'मुंबई डायरी'जच्या (Mumbai Diaries Season 2) दुसर्‍या सीझनचा टीझर (Mumbai Diaries Season 2 Teaser) रिलीज झाला आहे. टीझरसोबतच निर्मात्यांनी सीरिजच्या रिलीज डेट 26 ऑक्टोबर असल्याचं जाहीर केलं आहे.प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांना ही वेबसीरिज पाहता येणार आहे. मुंबईतल्या पूरपरिस्थितीमध्ये डॉक्टर ओबेरॉय आणि त्यांची मेडिकल टीम लोकांची कशी मदत करतात आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे यात दाखवण्यात आलं आहे. कोंकणा सेन शर्मा , मोहित रैना , टीना देसाई , श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे,नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे  आणि प्रकाश बेलावाडी हे कलाकार या वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत.