सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे (Govardhan Doltade) लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे (Shivaji Doltade) दिग्दर्शित ‘मुसंडी’ (Musandi Movie Teaser) या मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 26 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, हा संदेश पोहचवणारा ‘मुसंडी’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल, असा विश्वास दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला. रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी ‘मुसंडी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे, राम गायकवाड, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिशा सानप, रुचिता देशमुख, प्रियंका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, सोनाली गायकवाड, आकांक्षा कापे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्या भूमिका आहेत.