कोरोनामुळे गेली दोन वर्षे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यामध्ये नागपंचमी (Nagpanchami) साजरी करण्यावर निर्बंध होते. मात्र यावर्षी नागपंचमी उत्साहात (Nagpanchami Celebration In Battis Shirala) साजरी करण्यात आली. न्यायालयाचे संपूर्ण आदेश पाळून ही नागपंचमी साजरी झाली. नागपंचमी सणानिमित्त अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.