nat and katherine marriage

इंग्लंडच्या दोन महिला क्रिकेटपटूंनी लग्न केलं आहे. तब्बल ५ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर नताली स्किवर आणि कॅथरीन ब्रंट यांनी लग्नगाठ (Natalie Sciver Katherine Brunt Marriage) बांधली आहे. रविवारी २९ मे रोजी या दोघी विवाह बंधनात अडकल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

    nat katherine weddingदोन्ही खेळाडू ‘होम ऑफ क्रिकेट’ लॉर्ड्स येथे २०१७ च्या इंग्लंड महिला विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होत्या. या दोघींनी २०१७-१८ मध्ये अधिकृतपणे रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती.त्यांना २ वर्षांपुर्वीच लग्न करायचं होतं मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाही.

    nat and katherine marriage pics

    नॅट (नताली) स्किवर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिली समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.

    nat and katherine with friends

    नॅट आणि कॅथरीन या दोघीही इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये या दोघींचा साखरपुडा झाला होता.

    nat kathrine new photo

    आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये कॅथरीन ब्रंट आणि नॅट सायव्हर इंग्लंड संघाचा भाग होत्या. गतविजेता असल्याने स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सलग विजयांसह त्यांनी झटपट पुनरागमन केले.

    nat with katerine